परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

दहशतवादावर The End च्या दिशेने पाऊल !

'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’: केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

गेल्या काही वर्षांपासून  सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवाया हे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरले आहे. हल्लीच २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर विविध हत्यारांद्वारे हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यापुढे भारताच्या भूमीवरही कुठलाही दहशतवादी हल्ला हे भारताविरोधातील युद्धाची कारवाई मानली जाईल, तसेच त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.गेल्या महिन्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधी दहशतवादी तळांवर हल्ले करत पाकिस्तानला जबर दणका दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशांकडून एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. त्यात भारताच्या सक्त कारवाईमुळे बिथरलेला पाकिस्तान भारतातील नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत आहे. तर भारताने मात्र पाकिस्तानमधील हवाई तळ, दहशतवाद्यांचे अड्डे आणि लष्करी केंद्रांना लक्ष्य केले आहे.  









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!