आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद माध्यमिक विद्यालयात कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन

परळी वै. 

   येथील नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  आ.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नाथ शिक्षण संस्थेअंतर्गत शालेय क्रिडा व सांस्कृतिक सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाथ शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे व सहसचिव प्रदिप खाडे  यांच्या मार्गदर्शनात दि.१५ जुलै ते २२ जुलै २०२५ पर्यंत नाथ शिक्षण संस्थेअंतर्गत विविध शालेय स्पर्धा,शैक्षणिक मार्गदर्शन, आरोग्य विषयक मार्गदर्शन, माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व संवर्धन तसेच शालेय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत आज मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर, प्राचार्य श्री.शिंदे व्ही.एन.व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक श्री.विश्वास अशोक रोडे, जमील अब्बास शेख व समंदर बाबूमियाँ शेख,श्री.शुद्धोधन विश्वनाथ साळवे यांच्या हस्ते ५ वी ते ८ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्या पालकांनी मिलिंद विद्यालयात शालेय अभ्यासक्रमा सोबतच घेण्यात येत असलेल्या सहशालेय उपक्रमांचे कौतुक केले. तसेच सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !