इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

मुश्रीफ यांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार

ना. पंकजा मुंडेंचा पुढाकार ; गडहिंग्लज प्रशासकीय इमारतीला उपलब्ध करून दिली पशुसंवर्धनची जागा - अनेक वर्षांपासूनचा प्रश्न लागला मार्गी

उपमुख्यमंत्री अजित पवार - ना. पंकजा मुंडे यांच्यात बैठक ; मंत्री हसन मुश्रीफ यांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार


नवीन इमारतीत पशुसंवर्धन विभागालाही मिळणार स्वतंत्र कार्यालय


मुंबई।दिनांक ०२।

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील उप विभागीय कार्यालयाच्या जागेचा प्रश्न अखेर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार आणि ना. पंकजाताई मुंडे यांच्यात आज झालेल्या बैठकीत

पशुसंवर्धन विभागाने त्यांची ७५ आर जमीन यासाठी उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान या नवीन इमारतीत पशुसंवर्धन विभागाचे देखील स्वतंत्र कार्यालय असणार आहे. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबद्दल ना. पंकजाताईंचे आभार मानले आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ना. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज विधानभवनातील त्यांच्या समिती कक्षात कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


   वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,आमदार आशुतोष काळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे सचिव रामास्वामी ए., पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे (व्ही.सी.द्वारे) व अन्य संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची ३.०६ एकर जागा आहे. त्यापैकी ०.७५ हे.आर. जागा पशुसंवर्धन विभागाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार नवीन तालुका पशुसंवर्धन व दुग्धविकास उपायुक्त या कार्यालयासाठी स्वतंत्र मजला प्रस्तावित बांधकामांमध्ये समाविष्ट करावा, उर्वरित जागा पशुसंवर्धन विभागाकडे ठेवावी असा निर्णय बैठकीत झाला.


गडहिंग्लज हे उपविभागीय कार्यालय असलेले शहर आहे. या ठिकाणी प्रांत कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, सहकार, कृषी इत्यादी कार्यालय आहेत आणि ती सर्व भाड्याच्या जागेत आहेत. नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध नव्हती. ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने ती आता  पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्व महत्त्वाच्या विभागांच्या कार्यालयासाठी एकत्र प्रशासकीय इमारत बांधणे शक्य होणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.


मुश्रीफ यांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार 

--‐--

प्रशासकीय इमारतीला पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा  प्रश्न आता मार्गी लागल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या