सतीश मुंडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव

भाजपच्या राज्य परिषद सदस्यपदी परळीतील सतीश मुंडे यांची नियुक्ती


मंत्री ना.पंकजा मुंडे व मा. खा. डॉ.प्रितम मुंडे यांचे सतीश मुंडे यांनी मानले आभार


सतीश मुंडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

       राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री ना.पंकजा मुंडे व माजी खा.प्रितम मुंडे यांचे विश्वासू भाजचे माजी तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांची भारतीय जनता पार्टी "राज्य परिषद" सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री ना.पंकजाताई मुंडे व मा. खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांचे सतीश मुंडे यांनी आभार मानले आहेत.  दरम्यान मंत्री पंकजा मुंडे व  खा. डॉ.प्रितम मुंडे यांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन नवनियुक्त सदस्य सतीश मुंडे यांनी केले.

        परळी वैजनाथ भारतीय जनता पक्षाच्या माजी तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे माजी सदस्य,भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीसाठी योगदान देणारे अशी ओळख असलेले सतीश मुंडे यांची भारतीय जनता पार्टी "राज्य परिषद" सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सतीश मुंडे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यापासुन निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. जिल्ह्यात दांडगा संपर्क असुन कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. जनसामान्य कार्यकर्ते सोबत घेऊन चालणारे , पक्षनिष्ठा असलेले व संघटनात्मक वाढीसाठी कठोर परिश्रम घेणारे तसेच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन असामान्य कर्तृत्व निर्माण व सिद्ध करण्याची जी कला प्रत्येकाला अवगत नसते पण ती कला यांनी कमी वेळेमध्ये अवगत केली, सामाजिक, धार्मिक, राजकीय, कार्यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवत आपल्या कार्याची चुणूक दाखवून त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत. तालुकाअध्यक्ष या पदावर असतांना परळी तालुक्यात गाव तिथे भाजप व घर तिथे भाजपचा कार्यकर्ता या पद्धतीने काम करत चांगले योगदान देत काम केले आहे. भाजपमध्ये विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पारपाडली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडीवर योगदान दिले आहे. गेल्या पाच वर्षात तालुकाध्यक्षपद सक्षमपने संभाळले आहे. अनेक अडचण काळातही त्यांनी आपली भूमिका चोख पणे संभाळली आहे. पंकजा मुंडे व मा. खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाचे शहर तसेच ग्रामीण भागात सचोटीने पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. भाजप पक्षाची विचारधारा प्रत्येकाच्या घराघरात पोचविण्याचे काम केले. पंकजा मुंडे व मा.खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या याच पक्षनिष्ठेची पावतीच म्हणून व त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सतीश मुंडे यांची भारतीय जनता पार्टी "राज्य परिषद" सदस्यपदी नियुक्ती केली आहे. तसेच सतिश मुंडे हे ना.पंकजाताई मुंडे व मा. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे अत्यंत विश्वासू असून या पुर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहीलेले आहे. परळी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचेही ते अध्यक्ष होते. सतीश मुंडे यांची भारतीय जनता पार्टी "राज्य परिषद" सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल परळी वैजनाथसह बीड जिल्ह्यातुनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकिय , सामाजिक, शैक्षणिक तसेच सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

      ना.पंकजाताई आणि मा.खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भाजपच्या "राज्य परिषद" सदस्यपदी निवड करून माझ्यावर खुप मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवून भाजपाचे काम वाढविणार असल्याचे सांगून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन सतीश मुंडे यांनी केले.भाजपच्या "राज्य परिषद" सदस्यपदी सतीश मुंडे यांची नियुक्तीबद्दल परळी मतदारसंघातील प्रत्यक गावात या निवडीचे स्वागत करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !