इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS : Congratulations...

 ॲड. प्रकाश कवठेकर यांना महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार


अमोल जोशी/पाटोदा         

   बीड येथील तेजस ग्रुप चे चेअरमन माजी जि प सदस्य ॲड प्रकाश दादा कवठेकर यांना के पी एम मीडिया पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

    थोडक्यात माहिती बीड येथील तेजस उद्योग समूहाचे चेअरमन व माजी जि प सदस्य ॲड प्रकाश दादा कवठेकर यांना 

ऑक्सीतेज मिनरल वॉटर या ब्रँड साठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तेजस बेवरेजेस या कंपनीच्या अंतर्गत ऑक्सितेज मिनरल वॉटर मार्केटिंग प्रोडक्शन क्वालिटी हे या कंपनी ने जपले आहे, सर्वसामान्य कुटुंबामध्ये येऊन बीड जिल्ह्यामध्ये स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचे काम दादांनी केला आहे आज मीतिला तेजस इलेक्ट्रिकल अँड सप्लायर्स, तेजस बेवरेजेस, तेजस इंडस्ट्रीज, तेजस अर्बन, तेजस अर्बन मल्टिनिधी, राजनंदनी अर्थमूव्हर्स इत्यादी कंपनी स्थापन करून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध केला आहे.ही कंपनी ग्रामीण भागात उभा करून शेकडो मुलांना रोजगार उपलब्ध केलेला आहे. आज मितीला मराठवाडा व शेजारील जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे.

 हा पुरस्कार वितरण सोहळा सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे हा सोहळा दिनांक 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल राजमुद्रा एचपी पेट्रोल पंपाच्या मागे मारुंजी गाव हिंजवडी पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे.

 हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध मान्यवर मित्रपरिवार यांच्या वतीने ॲड प्रकाश दादा कवठेकर यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!