युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

सर्व स्तरातून कौतुक.....!

 किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ धोकटेने जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पटकवला तिसरा क्रमांक

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

           कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था संचलित पुस येथील किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ धोकटे यांनी बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवल आहे. समर्थ धोकटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन  करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

            महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बीड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धे मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. योगासन स्पर्धेत ग्रामीण, शहरी विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग वाढावा, खेलो इंडिया, ऑलिम्पिक साठी खेळाडू तयार व्हावेत, तसेच सर्वत्र मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाचा प्रचार व्हावा यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात. नुकत्याच पार पडलेल्या बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धे मध्ये कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था संचलित पुस येथील किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ धोकटे यांनी बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवल आहे. त्यांच्या यशाबद्दल कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे व किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या