इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

दुर्दैवी घटना.....!

निलंबित पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांची गळफास घेऊन आत्महत्या!





अंबाजोगाईतील घटना; कुटुंबीय गेले होते गावी

अंबाजोगाई (प्रतिनिधी):  एप्रिल महिन्यात निलंबित झालेले  पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील राहत असलेल्या  घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. 

      परळी तालुक्यातील नागदरा हे सुनील नागरगोजे यांचे मूळ गाव आहे. मात्र अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह अंबाजोगाईत वास्तव्यास होते. परभणी, लातूर, बीड येथे त्यांनी काम केले होते. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता. परभणी येथे त्यांनी एका पोलिस अधीक्षकांना शिविगाळ केली होती. त्या प्रकरणात चौकशी सुरू होती. बीडला बदली झाल्यानंतरही त्यांनी एका कर्मचा-याला शिविगाळ करून धमकी दिली होती.बीडला त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवेले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल २०२५ मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेंव्हापासून ते नैराश्यात होते. अंबाजोगाई येथील घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

             त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले  असा परिवार आहे. दरम्यान सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या कधी व का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सुनील नागरगोजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी तथा शवविच्छेदना साठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या