इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

विदारक परिस्थिती....शेतकऱ्यांवर दुर्देवी वेळ....

आठ एकर पीकासोबत जमीन वाहून गेली, विवंचनेत बोरगाव येथील शेतकऱ्याने जीवन संपवले 




 नेकनुर.....सततच्या पावसाने पिके तर  गेलीच शिवाय मांजरा नदीच्या बाजूला असलेले आठ एकर पिकासोबत शेत वाहून गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या  केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकऱ्यांने  शेतात विजेला स्पर्श करून जीवन संपवले . रमेश ज्ञानोबा गव्हाणे वय ६२ असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

            शेतातील सोयाबीन सततच्या पावसाने कुजून गेले शिवाय मांजरा नदीच्या पाण्याने नदीकाठची उत्पन्न देणारी जमीन वाहून गेली यामुळे आता पुढे काय करायचे  यामुळे विचारात असलेल्या केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा गव्हाणे  वय .62 यांनी शेतात असलेल्या विजेच्या ट्रान्सफरला जाऊन स्पर्श करीत मंगळवारी दुपारी जीवन संपवले .त्यांना केज उपजिल्हा रुग्णालयातून अंबाजोगाई रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी मयत घोषित केले. बुधवारी अंबाजोगाई रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले असून बोरगाव येथे दुपारी अंत्यविधी करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या