परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
'सरकारने आमच्या समाजाचा घात केला', ओबीसी तरुणाची आत्महत्या, मांजरा नदीत मारली उडी
Latur : OBC: Youth: Ends: Life: लातूरमध्ये ओबीसी समाजाच्या एका तरुणाने आत्महत्या केली. मांजरा नदीत उडी मारत त्याने आयुष्य संपवले. सरकारने आमच्या समाजाचा घात केला असल्याचा आरोप त्याने केला. सुसाईड नोट पोलिसांना सापडली.
Latur: मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमध्ये ओबीसी समाजातील तरुणाने मांजरा नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लातूरच्या रेनापूर तालुक्यातील वांगदरी येथे ही घटना घडली. भरत महादेव कराड असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 'मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसी आरक्षण कायमस्वरूपी संपवलं आहे, सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसीविरुद्ध जीआर काढला.' अशा प्रकारची चिठ्ठी लिहीत या तरुणाने मांजरा नदी पात्रा उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिस करत आहेत.
Susid: भरत कराड या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीमध्ये लिहिले की, मी भरत महादेव कराड आताच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसीचे कायमस्वरूपी आरक्षण संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा.' या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा