इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

परळीतून प्रकाशित दर्जेदार दिवाळी अंक......

 'परळी परिसर’च्या दिवाळी अंकाचा पुण्यात डंका



राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत तृतीय पुरस्कार जाहीर

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- गेल्या दहा वर्षापासून परळी वैजनाथ (जि.बीड) येथून नियमित प्रकाशित होणार्‍या साप्ताहिक ‘परळी परिसर’च्या यंदाच्या दिवाळी अंकाला पुणे येथील ‘मराठीबोली’ या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

येत्या ४ जानेवारीला या पुरस्काराचे वितरण पुणे येथे एका खास समारंभात होणार आहे. मराठीबोलीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या मे २०१७ पासून परळी वैजनाथ येथून साप्ताहिक परळी परिसर हे वर्तमानत्र नियमित प्रसिद्ध होत आहे. परळी परिसरातील आठवडाभरातील घडामोडींसह प्रत्येक अंकात नवा विषय आणि नवा विचार मांडणार्‍या या वर्तमानपत्राने बीड जिल्ह्यात वर्तमानपत्राच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळविले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका कायम ठेऊन दरवर्षी दिवाळीला निघणार्‍या वाचनिय व दर्जेदार दिवाळी अंकाची परंपरा साप्ताहिक परळी परिसरने आजपर्यंत जपली आहे. यंदाचा परळी परिसरचा नववा दिवाळी अंक होता. प्रत्येक दिवाळी अंकात नवा विषय घेऊन अंक वाचकांच्या हाती दिला जातो. वाचकांकडून अंकाचे भरभरून स्वागत होते. परळी परिसरच्या यंदाच्या दिवाळी अंकात परळी पालिकेच्या कारभारावर ‘कव्हर स्टोरी’ प्रसिद्ध केली होती. याशिवाय विविध विषयावरील लेख, कवीता, कथा, ललित, पुस्तक परिक्षण, मनोरंजन, नागरी समस्या आदी साहित्य या अंकात समाविष्ट होते. बहुरंगी व उत्कृष्ट मांडणी व दर्जेदार साहित्य यामुळे साप्ताहिक परळी परिसरचे दिवाळी अंक वाचकप्रिय ठरले आहेत. दिवाळी अंकाचा वाचकांनी सदैव गौरवच केला आहे.

मराठीबोली, पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२५ च्या स्पर्धेत साप्ताहिक परळी परिसरच्या यंदाच्या दिवाळी अंकाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून निघणार्‍या विविध नियतकालिके, दैनिके, साप्ताहिकांचे दिवाळी अंक होते. या अंकातून परळी परिसरच्या दिवाळी अंकाची तृतीय पुरस्कारासाठी संयोजकांकडून निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण येत्या ४ जानेवारीला विशेष समारंभात पुणे येथे होणार आहे. परळी सारख्या छोट्या शहरातून प्रसिद्ध होणार्‍या दिवाळी अंकाची दखल घेऊन पुरस्कार मिळतो ही परळीतील वर्तमानपत्रांसाठी अभिमानाची बाब आहे. या यशाबद्दल साप्ताहिक परळी परिसरच्या संपादक एस.एल.वाकडे, कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे व सर्व सहकारी टीमचे अभिनंदन येथे पत्रकार व मित्र परिवारांनी केले आहे. दरम्यान, दिवाळी अंकाचे वाचक, वर्गणीदार, अंकाला सदैव साहित्य पाठविणारे लेखक, कवी तसेच जाहिरातदार, विक्रेते आदींचे या गौरवाबद्दल संपादकांनी आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या