गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

 मराठी साहित्य हे पर्यावरण संवेदनेने समृद्धआहे." - प्रा.संजय आघाव




परळी , दि.२९ /१२ /२०२५ (प्रतिनिधी )

    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगरच्या विद्यापीठ विकास मंडळाच्या मान्यतेने व अनुदानाने घेण्यात येत असलेल्या व्याख्यानमालेत बोलत असताना प्रा.संजय आघाव यांनी यावेळी "मराठी साहित्य हे पर्यावरण संवेदनेने समृद्धआहे." असे मत मांडले. साहित्यातील पर्यावरणीय जागरूकतेचे विश्लेषण करत त्यांनी यावेळी निसर्गाशी निगडित साहित्यिक कल्पना आणि समकालीन आव्हानांचा उल्लेख केला.हे व्याख्यान मराठी साहित्यातील पर्यावरण संरक्षणाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे ठरले.यावेळी प्रा.डॉ.राजाभाऊ धायगुडे यांनी

 प्रा.वा.ल.कुलकर्णी यांचे साहित्य क्षेत्रात समीक्षक म्हणून असलेले योगदान यावर प्रकाश टाकत टाकत या व्याख्यानमालेबद्दल गौरवोद्गार काढताना, "साहित्याची सामाजिक जबाबदारी उजळणारी ही व्याख्यानमाला आहे. " असे मतही नोंदविले. प्रा. डॉ. राजाभाऊ धायगुडे यांनी यावेळी प्रा.वा.ल. कुलकर्णी यांचा वाङ्मयीन दृष्टिकोन आणि कलावादी विचार ,लेखनातील ऐतिहासिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा शोध यावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसादजी देशमुख यांनी मराठी साहित्याचे महत्त्व विशद करत त्यात प्रा.वा.ल. कुलकर्णी यांचे योगदान यावरही दृष्टीक्षेप टाकला.

      या व्याख्यानांमुळे साहित्यिक आणि पर्यावरणीय चर्चेला नवे आयाम मिळाले.जे मराठी वाङ्‌मयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरले ​. श्रोत्यांनी या विषयांवर सखोल चर्चा केली आणि साहित्याच्या सामाजिक जबाबदाऱ्यावर भर दिला.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.श्याम नेरकर , प्रा.डॉ. कल्याणकर राजश्री , प्रा.डॉ. जोशी आर.एल , प्रा.डॉ.गोविंद कुलकर्णी, प्रा.डॉ.अरुण चव्हाण, प्रा.अशोक पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रकटन प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या