युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मुलीच्या वयाच्या महिलेवर अत्याचार...

५७ वर्षीय नराधमाचा ३५ वर्षीय असहाय्य विधवेवर बलात्कार



केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५७ वर्षीय नराधमाने त्याच्या मुलीच्या वयाच्या एका ३५ वर्षीय विधवेवर बलात्कार केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

      या बाबतची माहिती अशी की, दि. २४ रोजी युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावळेश्वर (पैठण) येथील मधुकर उर्फ मदन विश्वनाथ म्हस्के वय ५७ वर्ष याने एका ३५ वर्षीय विधवा महिलेला शेतातील भाजीपाला घेऊन जा. असे म्हणून शेतात बोलावले. सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास ती विधवा महिला शेतात गेली असता तेथे कोणी नसल्याचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन मधुकर उर्फ मदन विश्वनाथ म्हस्के वय (५७ वर्ष) याने तिच्याशी झोंबाझोंबी करून तिच्यावर अतिप्रसंग करून बळजबरीने बलात्कार केला. तसेच याची वाच्यता केली किंवा कुणाला जर सागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. 

दरम्यान पीडितेने या तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या नुसार युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात मधुकर उर्फ मदन विश्वनाथ म्हस्के वय (५७ वर्ष) याच्या विरुद्ध गु. र. नं. ३२६/२०२५, भा. न्या. सं. ६४, ७५, ७६, ७८, ७९, ११५(२),३३३, ३५१, ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे हे तपास करीत आहेत.

गुन्हा दाखल होताच अवघ्या एक तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या 

     सदर घटना गंभीर स्वरूपाची असल्याने गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमजद सय्यद आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल मोरे यांनी शिताफीने एका तासात आरोपींचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

नराधमाला पोलिस कोठडी 

   मुलीच्या वयाच्या ३५ वर्षीय विधवेवर बलात्कार करणारा मधुकर उर्फ मदन म्हस्के याला न्यायालयाने दि. २६ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या