परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळीतील चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी
ना. पंकजा मुंडेंचा बीडच्या एसपींना फोन ; आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे दिले निर्देश
बीड।दिनांक ०१।
परळीच्या रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींविरुद्ध कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज बीडच्या एसपींना दिले.अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य करणारा नराधम कोणत्याही परिस्थितीत सुटता कामा नये, अशी शिक्षा त्याला झाली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.
रेल्वे स्थानक परिसरात बाहेरगावाहून आलेल्या एका दाम्पत्याच्या पाच वर्षाच्या बालिकेवर शनिवारी एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेबाबत ना. पंकजाताई मुंडे यांनी बीडचे एसपी नवनीत कॉवत यांना फोन करून सर्व माहिती घेतली. हा प्रकार अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे, आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटता कामा नये, अशी केस तयार करून त्याला कडक शिक्षा करा असे निर्देश त्यांनी दिले. पिडित चिमुरडीवर सध्या अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ना. पंकजाताई मुंडे यांनी रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ धपाटे यांनाही फोन करून चिमुरडीच्या तब्येतीची विचारपूस केली आणि तिच्यावर योग्य ते सर्व उपचार करण्यास सांगितले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा