शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त परळीत 23 जानेवारीला सर्वपक्षीय अभिवादन सभा




ठाकरे गटाच्या वतीने आयोजन; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ / प्रतिनिधी :

विश्वहिंदू हृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त परळी शहरात शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भव्य सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही अभिवादन सभा परळी वैजनाथ येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमास परळी शहरासह पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांवर तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेवर अपार प्रेम होते. “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” हे त्यांचे ब्रीदवाक्य आजही समाजाला दिशा देणारे असून, त्यांचे विचार आजही कोट्यवधी शिवसैनिकांच्या मनात जिवंत आहेत.त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित या सर्वपक्षीय अभिवादन सभेद्वारे बाळासाहेबांच्या विचारांना व कार्याला सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे परळी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी या अभिवादन सभेस आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!