प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

सायबर पोलिस ठोकणार बेड्या!

धनंजय मुंडेंच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते काढणे पडणार महागात




फेसबुकवर धनंजय मुंडेंच्या नावाने बनावट खाते काढून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात फिर्याद दाखल

बीड (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नावाने फेसबुक या सोशल मीडिया साईटवर खोटे अकाउंट काढून त्यावरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याने धनंजय मुंडे यांच्या वतीने संबंधित फेक अकाउंट विरोधात रीतसर कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संबंधित फेक खाते काढणाऱ्या व्यक्तीस आता ही चांगलेच महागात पडणार असून, सायबर पोलिस संबंधितास गुन्हा दाखल करून बेड्या ठोकणार आहेत.

    धनंजय मुंडे हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात, मात्र त्यांच्या नावाने फेसबुकवर (Dhanajay Munde) खोटे अकाउंट काढून त्यावरून काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याने बीड सायबर पोलिसात धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून स्वीय सहाय्यक तथा खाजगी जनसंपर्क अधिकारी सुदर्शन (सुधीर) सांगळे यांनी रीतसर फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबंधितास अटक करण्यासाठी पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. निलेश केळे करीत आहेत. 

धनंजय मुंडे यांनी याबाबत बीडचे पोलिस अधीक्षक श्री. नवनीत कावत यांच्याशी देखील संपर्क करून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून, संबंधितास लवकरच अटक करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन श्री. नवनीत कावत यांनी दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्या नावाने चालवण्यात येणारे सदरील खाते हे बनावट असून कुणीतरी जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने सुरू केले असून, संबंधित खात्याचा किंवा त्यावरील पोस्टचा आमच्याशी कोणताही संबंध नसून त्यावरून करण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टची जबाबदारी ही संबंधित फेक खाते धारकाची असल्याचे श्री. सांगळे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.


सायबर विभागाच्या कार्यपद्धतीनुसार संबंधित अज्ञात खाते धारका विरोधात प्राप्त फिर्यादीवरून भारतीय दंड संहितेच्या माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच लोकप्रतिनिधींच्या नावाने खोटे खाते उघडून त्यावरून बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. निलेश केळे यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान सदर फेसबुक खाते saurabhshelke1@gmail.com या इमेल आयडी वरून कुणीतरी शेळके नामक व्यक्ती चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत. 

असे खाते उघडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करणार

धनंजय मुंडे यांचे खाते असल्याचे भासवून बनावट खाते तयार करून किंवा धनंजय मुंडे यांचे नाव वापरून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, त्यामुळे असे खाते कुणी चालवत असल्यास तत्काळ त्यावरील पोस्ट डिलिट करून संबंधित खाते तत्काळ बंद करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन श्री. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या