प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 "अजितदादा अमर रहे" च्या घोषणा; अजितदादांच्या निधनाने शहरावर शोककळा : परळीत शाळा, बाजारपेठा बंद



परळी वैजनाथ: एमबी न्यूज वृत्तसेवा....

       महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची वार्ता धडकताच परळी शहरासह ग्रामीण भागात भीषण शांतता पसरली.  गेल्या १५ वर्षांपासून परळीच्या विकासात आणि राजकारणात अविभाज्य घटक राहिलेल्या अजितदादांच्या जाण्याने परळी पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या अनुषंगाने परळीची बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती चौकात एकत्रित येत "अजितlदादा पवार अमर रहे" च्या घोषणा देत भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली.

बाजारपेठा आणि शाळा बंद; शहर झाले शोकाकुल...

  अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच परळीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, तर शाळांनाही सुट्टी देण्यात आली. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात जमलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी होते. भाजप, राष्ट्रवादी आणि इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मतभेद बाजूला सारून आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

भेटीची संधी कायमची हुकली.....

      माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी अत्यंत जड अंतःकरणाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. "आम्ही आणि आमदार धनंजय मुंडे साहेब लवकरच विकासकामांच्या शुभारंभासाठी दादांची वेळ घेणार होतो. नवनिर्वाचित पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी बारामतीला जाणार होते; मात्र नियतीने ती संधीच हिरावून घेतली," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सलग तीन टर्म नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांच्या पाठीशी दादांचा हिमालयीन आधार होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

'असा नेता पुन्हा होणे नाही'

     परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे 'दादा' आज गेले आहेत. त्यांच्या जाण्याने एका मोठ्या युगाचा अंत झाला असून ही पोकळी कधीही भरून निघणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी ॲड. अरुण पाठक, वैजनाथ कळसकर, आयुब पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या