इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

 मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी १७ एप्रिलला बीडमध्ये मोर्चा; खासदार बजरंग सोनवणे यांचा जाहीर पाठिंबा




बीड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात न्याय्य हक्क मिळावेत या प्रमुख मागणीसाठी बीड येथे दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी भव्य मुस्लिम आरक्षण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला बजरंग मनोहर सोनवणे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला मोठे बळ मिळाले आहे.

याबाबत सकल मुस्लिम आरक्षण कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या अधिकृत पत्रात सोनवणे यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण अत्यंत आवश्यक असून, ही मागणी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पत्रात पुढे त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील अनेक मागास व वंचित घटकांप्रमाणेच मुस्लिम समाजालाही समान संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतिक व घटनात्मक जबाबदारी आहे. शिक्षण, रोजगार व आर्थिक उन्नती या क्षेत्रात मुस्लिम समाज मागे राहिल्याचे वास्तव लक्षात घेता, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, बीडमध्ये आयोजित करण्यात येणारा हा मोर्चा लोकशाही मार्गाने, शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या मोर्चामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यांचा देखील या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेऊन मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात या विषयावर राजकीय पातळीवरही हालचाली वेग घेण्याची चिन्हे आहेत.

खासदार सोनवणे यांनी आपल्या पत्रात या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देत, मोर्चा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच लोकशाही पद्धतीने मांडल्या जाणाऱ्या या मागण्यांची शासनाने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या