डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय एकात्मतेचे शिल्पकार - रामेश्वर बचाटे पाटील 



 वडगाव स्टे : भारतातील विद्वान व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगभरात आहे आणि त्यांना ज्ञानाचे प्रतीक म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते, भारतातील विविधता बघता या विविधतेत एकात्मता निर्माण करणे हे अवघड होते, भारतीय एकात्मतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व विविधतेला एकतेत आणले. असे मत रामेश्वर बचाटे पाटील यांनी व्यक्त केले.

 सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टे. येथे भीम नगर भागात मागील चार वर्षांपासून विविध उपक्रमांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते, यावर्षी 135 जयंती निमित्त पूर्ण आकृती पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच मान वंदना घेण्यात आली,  पंचशील धवजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना रामेश्वर बचाटे पाटील यांनी महामानवांनी जगातील संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी खूप सारे काम केलेले आहे, आणि त्यांच्या कष्टामधून पुढच्या पिढ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मिळत आहे, भारतात विविधता असताना ही एकता निर्माण करण्याचे काम संविधानाची निर्मिती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी वडगाव स्टेशनचे सर्व ग्रामस्थ व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!