सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक की जाणीवपूर्वक उडवले? प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे एका धक्कादायक घटनेत प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प...

परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात...

महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा : परळी केंद्रातील संच क्र. ६ चा ऐतिहासिक उच्चांक - मुख्य अभियंता सुनील इंगळे




परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात

परळी | प्रतिनिधी

“महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महानिर्मितीचा मोलाचा वाटा असून राज्याच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक प्रगतीसाठी अखंडित वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संच क्रमांक ६ ने सलग १४० दिवस पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला असून महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा प्रदान केली आहे,” असे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी केले.ते ६६ व्या महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

परळी औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवार दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, कामगार तसेच कंत्राटी कामगारांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन अभिवादन केले.

यावेळी बोलताना सुनील इंगळे यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्या समन्वय, मेहनत आणि निष्ठेमुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. संच क्रमांक ६ ने सलग १४० दिवस पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून केंद्राच्या कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यातही महाराष्ट्राच्या विकासासाठी महानिर्मिती अधिक प्रभावी योगदान देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास उपमुख्य अभियंता महेश महाजन, अधीक्षक अभियंता राजू रेड्डी, संभाजी बुकतारे, धनंजय कोकाटे, प्रसन्नकुमार गरुड, गोस्वामी, मदन पवार, सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक बी. आर. अंबड, मेस्कोचे गौतम गायकवाड, वैशाली ठोंबरे, सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, कामगार नेते हरिराम गित्ते, सोपान चौधर, बप्पा वडमारे, व्यंकटराव रामोड, के. एच. गित्ते मॅडम, ज्योती राख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गाजले यांनी केले. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या