प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे.

प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित

महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहेत.

"नगर परिषद प्रशासनाने फक्त स्वतःची वाहवा मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या. घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या परळीतील गरीब आणि मागासवर्गीय बांधवांची ही थट्टा आहे. जर निधी खरोखरच मंजूर झाला असेल, तर तो लाभार्थ्यांच्या खात्यावर का दिसत नाही? प्रशासनाने तात्काळ हा निधी प्रत्यक्ष जमा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." असेही महादेव गंगणे पाटील यांनी स्पष्ट केले.

परळी नगर परिषदेच्या या भोंगळ कारभारामुळे शहरांमधील घरकुल लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने यावर तत्काळ स्पष्टीकरण देऊन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा न केल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही महादेव गंगणे पाटील यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या