प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

 ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

 तुटपुंजे बिल देत शेतकऱ्यांची फसवणूक


ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सत्याग्रह आंदोलन सुरूच

परळी / प्रतिनिधी...ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिलाची रक्कम, तोडणी मजुरी, वाहतूक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने वारंवार निवेदने, भेटी घेऊन मागील चार महिन्यापासून प्रत्येक वेळी आश्वासनाची पोकळ बोळवण करून वेळ मारून नेत वेळ काढूपणा सुरू असल्याने शुक्रवार दि 8 रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. आंदोलनाची धास्ती घेत जानेवारी महिन्यातील गाळप केलेल्या ऊस देयक पोटी 1800 देय करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरीच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

ऊस गळीत हंगाम सुरू होताना ओंकार शुगर्स कडून 2950 रु भाव जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अमिष दाखवत ऊस गाळप सुरू केला. गाळप हंगामापासून ते दि 15 जानेवारी गाळप केलेल्या ऊस देयक पोटी शेतकऱ्यांना 2950 रुपयांनी ऊस देयक ओंकार साखर कारखान्याने अदा केली मात्र तदनंतर गाळप झालेल्या ऊसाची देयके 3 महिन्याचा काळ लोटला तरी साखर कारखानाकडून अदा करण्यात आली नाहीत. नियमानुसार ऊस गाळप पश्चात 15 दिवसात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देयक अदा करणे बंधनकारक असताना साखर कारखानदार या नियमांची सर्रास पायमल्ली करत असून ओंकार शुगर्सने देखील दि 15 जानेवारी नंतर गाळप केलेल्या ऊस देयक महिनोन्महिने थकीत ठेवले. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मार्फत वेळोवेळी निवेदने, आंदोलने केली असता ऊस देयकापोटी  साखर कारखान्याकडून एकाच हंगामात पहिले 2950 रु आणि दि 15 जानेवारी नंतर गाळप झालेल्या ऊस देयक पोटी 1800 रु देयक देण्यात येत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याने जाहीर केलेला 2950 रु चा भाव, कष्टाचा मोबदला मिळावा याकरिता शुक्रवार दि 8 रोजी भर उन्हात सत्याग्रह आंदोलनाला बसला आहे. मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास कारखान्यास टाळे ( कुलूप) लावण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या सत्याग्रह आंदोलनात संगर्षं समितीचे ऑड.अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, ऑड.श्रीनिवास मुंडे, श्रीराम बडे, पांडुरंग गणगे, दिगंबर देशमुख, सूर्यकांत तिडके, हनुमंत सोळंके, मनोज मुंडे, रामदास दिवटे, बिबीशन गीते यांच्यासह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या