प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

 चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन



दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

बीड ,प्रतिनिधी :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य शाखेचे संरक्षण सचिव आयु. अमरसिंह ढाका आणि राज्य संघटक आयु. डी. एस. नरसिंगे यांच्याकडे नावनोंदणी केलेल्या धर्मांतरित बौद्ध बांधवांना या विशेष शिबिरात प्रवेश देण्यात आला आहे. सर्व सहभागी बांधवांचे मंगळवार दि. १२/०५/२०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता चैत्यभूमी येथे हार्दिक स्वागत करण्यात येणार आहे.

शिबिरात सहभागी होणाऱ्या बांधवांनी दि. १२ मे रोजी दुपारी ४ वाजता मुंडन करून शुभ्र वस्त्र परिधान करून आवश्यक साहित्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या विशेष धम्म प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञान, आचार-विचार, धम्म प्रचार व सामाजिक प्रबोधन यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, समाजामध्ये धम्म कार्य अधिक प्रभावीपणे रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या