सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक की जाणीवपूर्वक उडवले? प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे एका धक्कादायक घटनेत प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प...

अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार

 ना. पंकजा मुंडे यांचा परळीत प्रभावी ‘जनता दरबार'




परळी, बीडसह जिल्ह्यातील  नागरिकांच्या समस्यांचा जागेवर निपटारा

परळी वैजनाथ  दि.०२ ---  परळीसह बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करता यावे, त्यांचे जीवन कष्टमुक्त व्हावे या उदात्त हेतूने ना. पंकजाताई मुंडे या त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात ‘जनता दरबाराचे' आयोजन करतात. नेहमी प्रमाणे आजही त्यांचा भव्य जनता दरबार संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शासकीय विश्रामगृहात ना. पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार पार पडला. यात बीड जिल्ह्यातील आणि परळी तालुक्यातील असंख्य नागरिकांनी त्यांच्या समस्या व गाऱ्हाणी मांडल्या. ना. पंकजाताई मुंडे यांनी तत्परतेने प्रत्येक विषयात लक्ष देऊन संबंधित शासकीय, निमशासकीय विभागांना बोलून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार

----

ना. पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार म्हणजे समस्या मार्गी लागण्याची हमी असते. प्रशासकीय कामांसह नागरिकांचे व्यक्तिगत सुख, दुःखाचे विषय देखील पंकजाताईंच्या माध्यमातून मार्गी लागतात. शासकीय विश्रामगृहाच्या भरगच्च सभागृहातील अलोट गर्दी याची साक्ष देत होती. प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत  तात्काळ संबंधिताना संपर्क करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना देऊन जागेवर त्यांनी समस्यांचा निपटारा केला. त्यांचा हा प्रभावी जनता दरबार सर्वसामान्यांचे जीवन कष्टमुक्त करण्याची अभिनव संकल्पना असल्याची भावना यावेळी नागरिक व्यक्त करत होते.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या