इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 परळीच्या भूमिपुत्राचा छत्रपती संभाजीनगर येथे गौरव



योग प्रशिक्षक पोलिस हवालदार सचिन डाके यांचा प्रशंसापत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्यालयाच्या मैदानावर भव्य योग व प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परळी वैजनाथचे भूमिपुत्र तथा योग प्रशिक्षक पोलिस हवालदार सचिन डाके यांनी योग आणि प्राणायामाचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी फायदे तसेच दैनंदिन जीवनात योगाचे स्थान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सचिन डाके यांनी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध योगासने, प्राणायामाचे प्रकार आणि तणावमुक्त व निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेल्या योगक्रिया प्रत्यक्ष करून दाखवल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्तपणे योग व प्राणायामाचा सराव केला.

या कार्यक्रमास राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 च्या समादेशक श्रीमती कविता नेरकर-पवार, सहायक समादेशक श्री. किसन येमुरे, समादेशक सहायक श्री. अकबर शेख, तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व मोठ्या संख्येने पोलीस अमलदार उपस्थित होते. समादेशक श्रीमती कविता नेरकर-पवार यांनी स्वतः योग व प्राणायामामध्ये सहभाग घेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सचिन डाके यांनी केलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. योग क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने त्यांचा प्रशंसापत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी सचिन डाके यांच्या योग प्रसाराच्या कार्याचे विशेष कौतुक केले. पोलिस दलामध्ये आरोग्यदायी जीवनशैली रुजविण्यासाठी तसेच समाजात योगाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

परळी वैजनाथच्या या भूमिपुत्राने राज्य राखीव पोलीस बलासारख्या महत्त्वाच्या विभागात योग प्रशिक्षण देऊन परळीच्या नावाचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल परळी शहरासह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, योग क्षेत्रातील त्यांची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. **

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या