दुःखद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

इमेज
जितेंद्र नव्हाडे यांना मातृशोक; सौ.नंदाबाई नव्हाडे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           येथील सेवानिवृत्त शिक्षक विलासराव नव्हाडे यांच्या पत्नी सौ नंदाबाई विलासराव नव्हाडे यांचे आज दि. 12 रोजी रात्री दहा वा. च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव जितेंद्र नव्हाडे यांच्या त्या मातोश्री होत.      सौ. नंदाबाई विलास नव्हाडे  अतिशय मनमिळावू व कुटुंब वत्सल गृहिणी म्हणून सर्व परिचित होत्या. आज सायंकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्या 66 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नव्हाडे परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.   आज अंत्यसंस्कार      दरम्यान,नंदाबाई नव्हाडे यांच्या पार्थिवावर आज दि. 13 रोजी परळी वैजनाथ येथे मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्...

आईच्या अस्थी विसर्जनासाठी प्राध्यापक पुत्राचा पायी तीर्थयात्रेचा संकल्प 

परळी वैजनाथ, दि. १० : प्रतिनिधी 

      आईच्या अस्थींचे विसर्जन विविध पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये करण्यासाठी एका प्राध्यापकाने कडक उन्हात पायी तीर्थयात्रेचा संकल्प केला आहे.या उपक्रमाची परिसरात चर्चा होत असून मातृभक्ती, श्रद्धा आणि दृढनिश्चयाचे हे उदाहरण मानले जात आहे. परळी वैजनाथ पासून जवळच असलेल्या आवलगाव ता. सोनपेठ येथील रहिवासी या प्राध्यापक पुत्राने आपल्या आईच्या अस्थी घेऊन आपली पायी वारी सुरू केली आहे.

      परळी वैजनाथ पासून जवळच असलेल्या सोनपेठ तालुक्यातील आवलगाव येथील रहिवासी रुक्मिणीबाई नारायणराव धोंडगे यांचे १४ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर त्यांचे पुत्र तथा जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील प्राध्यापक पंढरीनाथ धोंडगे यांनी आईच्या अस्थी पंढरपूर, आळंदी, तुळापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, काशी, प्रयागराज आणि गया येथे विसर्जित करण्याचा संकल्प केला.या तीर्थयात्रेसाठी कोणत्याही वाहनाचा वापर न करता किमान पंढरपूर आणि आळंदीपर्यंत पायी जाण्याचा निर्धार त्यांनी केला. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी वाढते तापमान व आगामी पावसाळ्याचा विचार करून वाहनाचा पर्याय सुचविला होता. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम राहत त्यांनी ६ जून रोजी आवलगाव येथून पायी प्रवासाला सुरुवात केली.

      सध्या राज्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले जात असतानाही प्रा. धोंडगे दररोज ३५ ते ४० किलोमीटर अंतर पार करत आहेत. मार्गातील गावांतील मंदिरांमध्ये त्यांचा मुक्काम होत आहे. आतापर्यंत अंबेजोगाई, युसूफवडगाव (जि. बीड), येरमाळा (जि. धाराशिव), खांडवी आणि उपळाई बुद्रुक (जि. सोलापूर) येथे त्यांनी मुक्काम केला असून पुढे आष्टी आणि शेटफळ मार्गे ते पंढरपूरला पोहोचणार आहेत.शुक्रवारी पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत स्नान करून आईच्या अस्थींचे विसर्जन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यानंतर आळंदी, तुळापूर, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेही ते जाणार असून पुढील सुट्टीत काशी, प्रयागराज आणि गया येथे अस्थी विसर्जनाचा विधी पार पाडण्याचा त्यांचा मानस आहे.

या प्रवासात अमोल धोंडगे, राधाकिशन गवळी, व्यंकटी जगाडे आणि हनुमान धोंडगे हे भोजन, चहापान आणि अन्य व्यवस्थेसाठी सहकार्य करत आहेत. त्यापैकी एक जण दररोज काही अंतर त्यांच्यासोबत पायी चालत असल्याची माहिती मिळाली. प्रा. धोंडगे यांचे मित्र व्यंकटी जगाडे म्हणाले, ‘‘पंढरीनाथ धोंडगे यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. त्यांच्या या प्रवासामुळे आम्हालाही पायी वारीचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे.’’ याबाबत बोलताना प्रा. पंढरीनाथ धोंडगे म्हणाले, ‘‘आई-वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट घेतात. त्यांचे ऋण फेडणे अशक्य आहे. आईवरील प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून मी विविध तीर्थक्षेत्रांवर पायी जाऊन तिच्या अस्थींचे विधीवत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.’’मातृभक्ती आणि श्रद्धेचा संगम असलेली ही पायी तीर्थयात्रा सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या