दुःखद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

जितेंद्र नव्हाडे यांना मातृशोक; सौ.नंदाबाई नव्हाडे यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     

     येथील सेवानिवृत्त शिक्षक विलासराव नव्हाडे यांच्या पत्नी सौ नंदाबाई विलासराव नव्हाडे यांचे आज दि. 12 रोजी रात्री दहा वा. च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव जितेंद्र नव्हाडे यांच्या त्या मातोश्री होत.

     सौ. नंदाबाई विलास नव्हाडे  अतिशय मनमिळावू व कुटुंब वत्सल गृहिणी म्हणून सर्व परिचित होत्या. आज सायंकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्या 66 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नव्हाडे परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

 आज अंत्यसंस्कार

     दरम्यान,नंदाबाई नव्हाडे यांच्या पार्थिवावर आज दि. 13 रोजी परळी वैजनाथ येथे मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी नऊ वाजता नव्हाडे  यांचे राहते घर शास्त्रीनगर, नाथ चित्र मंदिर पाठीमागे येथून अंत्ययात्रा निघणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!