इमेज
पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वीच आपल्याला दिला –भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले ! परळी वैजनाथ ।प्रतिनिधी-       वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन, नदी शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, आदी पर्यावरणीय समस्यांसाठी मानवाने सदैव जागरूक राहावे.यासाठी आता प्रयत्न होताना दिसतात मात्र पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच दिला असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर यांनी केले. परळीतील देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले आहे. भाविक कथा श्रवणात तल्लीन  होऊन जात आहेत.        पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत भागवत भक्तांसाठी हा सोहळा आध्यात्मिक मेजवानीची पर...

पोलिसांकडून तपास सुरू....

 खळबळ घटना: किराणा दुकानात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला

धारूर: तालुक्यातील पहाडी दहिफळ येथे शरद आश्रुबा धनवे (वय ४५, रा. सोन्नाखोटा) या व्यक्तीचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातीलच एका किराणा दुकानात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनेनंतर धनवे यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. 

     या घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक गिराम आणि पोलीस कॉन्स्टेबल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगत पहाटे दोन वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवला. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून धारूर पोलीस विविध अंगांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात असल्याचा संशय असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि गुन्ह्याची अचूक दिशा स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या