अंबाजोगाईत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो आणि अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, २२ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरातील दळण आणण्यासाठी पिठाच्या गिरणीकडे पायी जात होती. वाटेत आरोपी रमेश्वर नारायण बंडे याने तिला अडवून जबरदस्तीने जवळच्याच एका घरात ओढून नेले. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला बेदम मारहाण केली आणि धाकदपटशा दाखवून तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला.
या भयंकर प्रसंगानंतर अत्यंत घाबरलेली पीडित मुलगी कशीबशी घरी परतली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. संतप्त नातेवाइकांनी तातडीने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेचा जबाब घेऊन आणि तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा आरोपी रमेश्वर बंडे विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे करत आहेत.
#Beed #CrimeNews #JusticeForVictim #MaharashtraPolice #StopCrimeAgainstWomen
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा