सामाजिक कार्यकर्ते संतोष  शिंदे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी; सकल मराठा समाजाचे निवेदन

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

परळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भैय्या (जीवनराव) शिंदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संतोष शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा वस्तुस्थितीला धरून नसून संबंधित फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सदर घटना ही किरकोळ मतभेदातून घडलेली असून, चोरी करणे किंवा गंभीर स्वरूपाची इजा पोहोचविणे असा कोणताही हेतू संतोष शिंदे यांचा नव्हता, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे म्हटले आहे की, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या संतोष भैय्या शिंदे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून परळी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वास्तव परिस्थितीचा विचार करावा आणि अन्यायकारक पद्धतीने दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करताना सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या वतीने प्रशासनाने या प्रकरणात न्याय्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या