तुकाराम मुंडे यांची अखेर उचलबांगडी
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळी विरोधात कठोर मोहिम राबवून अनेकांना धडकी भरविणारे तुकाराम मुंडे यांची राज्य सरकारने महत्वाच्या पदावरुन उचलबांगडी केली आहे. मुंढे यांना महत्वाच्या पदावरुन हटविण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सुरुवातीस आयुक्तपद हे कमी दर्जाचे असून सरकारने आपला अवमान केल्याचे सांगत या पदावर रुजू होण्यास मुंढे ना खूश होते. मात्र राज्य सरकारने त्यांची अन्य पदावर नियुक्तीची विनंती फेटाळल्यानंतर मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कारवाई सुरु केली आहे. मुंढे यांनी गेल्या पंधरा- वीस दिवसात भेसळीविरोधात धडक मोहिम राबविली असून अन्न, औषधे, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कावाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठविले आहे. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हाॅटेलवरही मुंढे यांनी कारवाई करीत आपल्या कामाची चूनूक दाखविली आहे.
मुंढे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करीत त्यांची बदली करण्यासाठी काही नाराज मंडळी प्रयत्नशील असतानाच राज्य सरकारने मंगळवारी मुंढे यांना आणखी एक धक्का दिला. राज्य सरकारने प्रत्येक जिल्हयात प्रशासकीय सोयीसाठी पालक सचिवांची नियुक्ती केली आहे. जिल्हयात राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्याच्या साह्यासाठी तसेच जिल्हयातील प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात एका सचिवाची पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येते. या प्रथेनुसारच सरकारने तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असताना त्यांची परभणीचे पालक सचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आल्यानंतर मुंढे यांची आता परभणीच्या पालक सचिव पदावरुनही उचलबांगडी करण्यात आली आहे. तर मुंढे यांच्या जागी परभणीचे पालक सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अकोला जिल्हा पालक सचिवपदी कृषी सचिव परिमल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा