सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक की जाणीवपूर्वक उडवले? प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे एका धक्कादायक घटनेत प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प...

हरित परळी अभियानासाठी आज नियोजन बैठक; मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी




परळी वैजनाथ | प्रतिनिधी

    परळी शहर अधिक हिरवेगार, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने नगर परिषद परळीच्या वतीने लवकरच शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजनासाठी रविवार, दि. २१ रोजी सकाळी ७ वाजता जिजामाता उद्यान येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली.

     या बैठकीस ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. वृक्ष लागवडीसाठी योग्य स्थळांची निवड, वृक्षसंवर्धनाची कार्यपद्धती तसेच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. सध्या वाढते तापमान, घटते पर्जन्यमान आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने जगासमोर उभी आहेत. या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचे नगराध्यक्षा धर्माधिकारी यांनी सांगितले. शहरातील तापमान नियंत्रणात ठेवणे, भूजल पातळीत वाढ करणे, पर्जन्यमानाला पोषक वातावरण निर्माण करणे आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण उपलब्ध करून देणे या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

   एक वृक्ष म्हणजे केवळ झाड नव्हे, तर भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. चला, आपण सर्वजण मिळून परळीला महाराष्ट्रातील आदर्श हरित शहर बनविण्याचा संकल्प करूया. त्यामुळे या बैठकीस नगर परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या