इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 महेश अर्बन को-ऑप. बँक लि. येथे महेश नवमी निमीत्त महेश प्रतिमेचे पूजन




महेश अर्बन को-ऑप. बँक लि., परळी वैजनाथ येथे महेश नवमी निमीत्त महेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी परळीचे सुप्रसिध्द डॉक्टर  राजेंद्र जाजू यांचे हस्ते महेश प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी  हरीप्रसाद सारडा,  ओमप्रकाश तापडीया,  पवन तोतला इ. मान्यवर उपस्थित होते.

     महेश प्रतिमेच्या पुजनानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजेंद्र जाजू यांचा सत्कार बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी केला.  हरीप्रसाद सारडा यांचा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन गाडे यांनी केला.  ओमप्रकाश तापडीया यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष  ओमप्रकाश सारडा यांनी केला. तर  पवन तोतला यांचा सत्कार प्रदीप मुंडे यांनी केला.याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कचरूलालजी उपाध्याय व बँकेचे सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या