प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या  संजय दिना पाटील यांचा निषेध

मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीची दखल घेऊन संजय दिना पाटील याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एस. एम. देशमुख यांनी केली आहे..संजय दिना पाटील यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे.. सुरक्षा व्यवस्थेवरील पोलिसांसमोर त्यांनी ही धमकी दिली आहे हे अधिक गंभीर असून त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे.. 

संजय दिना पाटील आणि अन्य पाच खासदारांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.. त्यासंदर्भात त्यांची भूमिका, मतं जनतेपर्यंत पोहोचविणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे.. त्यासाठीच पत्रकार संजय दिना पाटील यांच्या घरी गेले होते.. तेथे गेल्यानंतर काही अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर संजय दिना पाटील भडकले आणि त्यांनी पत्रकारांना शिविगाळ सुरू केली..

"परत आलात तर मारून टाकील, घरासमोर उभे करतोय xxx मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका, माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा" अशी अर्वाच्च, आणि अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली .. खासदाराला न शोभणारी ही भाषा संतापजनक आहे निषेधार्ह आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत असे मत देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.. 

माझ्याकडे बॉम्ब आहे माझ्याकडं निदर्शनं करायला कोणी आलं तर बॉम्ब टाकेल, तसेच मी पाच खून केलेले आहेत अशी भाषा शिवसेनेला उद्देशून संजय दिना पाटील यांनी त्याअगोदर वापरली आहे.. एक खासदार माझ्याकडे बॉम्ब आहे अशी उघड धमकी देत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे, संजय दिना पाटलाकडे खरंच बॉम्ब आहे का? असेल तर तो कोठून आला? याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे..

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकावर अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर , विश्वस्त किरण ना़ईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, डिजिटल मिडिया परिषदेचे अनिल वाघमारे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या