इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

खा.बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप

 घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू

खा.बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप

केज : टाकळी (ता.केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या संवेदनशील गुन्ह्यातून पीडित कुटुंबाला न्याय मिळणे आवश्यक असतानाच, राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझा मुलगा सौरवचे नाव यात जाणीवपूर्वक ओढले जात आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी, आमचे सीडीआर काढावेत, आम्ही तपासाला सहकार्य करू, अशी भुमिका खा.बजरंग सोनवणे यांनी मांडली.

माध्यमांशी संवाद साधताना खा.सोनवणे म्हणाले, टाकळी येथील घटनेशी आमचा दूरवरचाही संबंध नाही. माझी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. या चौकशीअंती किंवा या गुन्हेगारी कटात माझा मुलगा अथवा मी स्वत: कुठेही दोषी आढळलो, तर आमच्यावर कायद्यानुसार जी कठोर कारवाई करायची आहे ती प्रशासनाने नि:संकोचपणे करावी. आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत. दरम्यान, या वादाला राजकीय रंग देऊन जिल्ह्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांचा प्रयत्न केला जात आहे. जर उच्चस्तरीय चौकशीमध्ये आमचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले, तर मग केवळ राजकीय आकसापोटी आमच्यावर बेछूट आरोप करणाऱ्यांवर आणि आपल्या प्रक्षोभक वक्तव्यातून बीड जिल्ह्यात अराजकता माजवू पाहणाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?, असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. तरुण विलास घुले यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेत जे आरोपी असतील त्यांना तातडीने अटक करावी आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील खा.सोनवणे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या