सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी
माझा कंटाळा आई-वडिलांकडे पाहिलं की आपोआप निघून जायचा - अग्निवीर ऋषिकेशने दिली विद्यार्थ्यांना प्रेरणा!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी तालुका परळी वैजनाथ येथे नव्या शैक्षणिक वर्षातील पहिली बाल सभा गुरुवारी संपन्न झाली. पहिल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सातवी वर्गाची विद्यार्थिनी कु आनंदी विष्णू मुंडे ही निवड करण्यात आली होती.
बालसभेचा यावेळचा विषय होता माझी शाळा. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गावचे सुपुत्र ऋषिकेश बिबीशन मुंडे ज्यांची नुकतीच आर्मीमध्ये निवड झाली आहे. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष केशवराव मुंडे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष केंद्रे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अग्निवीर म्हणून आर्मीमध्ये निवड झालेल्या ऋषिकेश बिबीशन मुंडे यांचा वडिलांसह सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता पाचवी वर्गातून शिष्यवृत्तीसाठी पास झालेली विद्यार्थिनी मानवी माणिक मुंडे हीच ही यावेळी सन्मान करण्यात आला.
इयत्ता चौथी ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी माझी शाळा या विषयावर आपले वक्तृत्व सादर केले. स्वतःच्या शाळेबद्दल आणि शाळेच्या विविध उपक्रमाबद्दल बोलताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांचेही कौतुक केले. या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षण शाळेतील शिक्षक श्री विष्णू ढाकणे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु गायत्री भागवत मुंडे आणि इयत्ता पाचवी वर्गातील अमृता मारुती मुंडे यांनी केले. बाल सभेच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी इयत्ता सातवी वर्गाकडे होती.
आर्मीत निवड झालेल्या ऋषिकेशची छोटीशी मुलाखत चंद्रशेखर फुटके सर यांनी घेऊन त्यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांना ऋषिकेश कडून प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश होता. अभ्यासाला दिला जाणारा वेळ, अभ्यासाची पद्धत, कंटाळा आल्यानंतर काय करायचे असे रंजक प्रश्न विचारण्यात आले. याच जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवी वर्गाचे शिक्षण घेतल्याचे ऋषिकेशने यावेळी आठवणीने सांगितले. सातवीपर्यंतचा अभ्यासच पुढील आयुष्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे हेही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
बाल सभा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुभाष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री जे के चौधरी, चंद्रप्रकाश लोखंडे, विष्णू ढाकणे, श्रीमती संध्या नागरगोजे, चंद्रशेखर फुटके, दीपक खंदारे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा