दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      
शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.

     आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी दारूच्या आहारी गेलेले अनेक युवक यातून घरात मारामारी करतात, कुटुंबीयांना त्रास देतात एवढेच नाही तर अनेक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कष्टकरी कुटुंबांना यामुळे रस्त्यावर यावे लागत असून दारूमुळे या भागातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. यापूर्वी दोन वेळा दारूबंदी करण्याची मागणी घेऊन पोलीस ठाण्यासमोर उपोषण आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलीस थातूरमातूर कारवाई करतात त्यानंतर पुन्हा जशाला तसे हे धंदे सुरू होतात असा आरोप या नागरिकांनी केला आहे. आमच्या कुटुंबाच्या उध्वस्तीकरणाला  ही दारूच कारणीभूत असून साठे नगर भागातील दारूबंदी मुळापासून बंद करा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा साठेनगर भागातील नागरिकांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने साठेनगर भागातील नागरिक उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, विद्यमान नगरसेवक नितीन रोडे, आदिसह या भागातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते. यावेळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी या नागरिकांना दारूबंदीचे आश्वासन दिले असेल पोलीस तात्काळ या ठिकाणी कारवाई करून संपूर्ण दारूबंदी करतील असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या