बॅंक व्यावस्थापक विरोधात १६ जून रोजी अंदोलन
सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखे समोर बेमुदत ठिय्या अंदोलन
सिरसाळा : पत्रकार,शेतकरी,नागरिक यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखेच्या व्यावस्थापक संदिप रेड्डी वर तात्काळ कार्यवाही करावी , या ठिकाणाहून बदली करावी या मागणी साठी पत्रकार मिलिंद चोपडे व इतर दिनांक १६ जून रोजी महाराष्ट्र ग्रामीण बॅंके समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. या बाबत काल दिनांक ११ जून रोजी बॅंक प्रशासनास निवेदन दिले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे कि,
केसीसी खातेदार किती आहेत ? आपल्या शाखेतील कर्जमाफीत किती शेतकरी पात्र ठरत आहेत अशी विचारणा सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा व्यवस्थापकांना पत्रकार मिलिंद चोपडे यांनी विचारली असता व्यावस्थापकाने उद्धट वर्तन करत अंत्यत मग्रूरीने थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे, दिनांक १० जून रोजी पत्रकार मिलिंद चोपडे व इतर दोन शेतकरी समावेत परळी तालुक्यातील सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत गेले होते. या ठिकाणी उपस्थित असलेले व्यावस्थापक यांना पत्रकार मिलिंद चोपडे यांनी विचारले कि, आपल्या शाखेत किती पिक कर्जदार शेतकरी थकीत आहेत ? पैकी किती शेतकरी महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत पात्र आहेत ? या बाबत व्यावस्थापकाने अंत्यत मग्रूरीने उद्धट करत म्हणाले कि, मि माहिती सांगू शकत नाही, या मुळे संबंध व्यावस्थापकास बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक मागितला तर संपर्क क्रमांक ही न देता या उलट तो म्हणाला कि तुम्ही बॅंकेत कसे काय आलात ? बॅंकेत यायला परवानगी लागते असे म्हणत सेवेकास बोलावून पोलीसांना बोलावण्याचे त्याने सांगत थेट गुन्हा दाखल करेल अशी धमकी सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या व्यावस्थापकाने पत्रकार मिलिंद चोपडे यांना दिली. संबंधित व्यावस्थापक हा येथील शेतकऱ्यांशी नेहमीच उद्धट वर्तन करतो , याच्या उद्धट वर्तनाला येथील शेतकरी ,खातेदार वैतागले आहेत. या मुळे याची तात्काळ वरिष्ठ बॅंक प्रशासनाने दखल घेऊन बदली करावी अन्यथा बॅंके समोर अंदोलन केले जाईल असा इशारा निवेदना द्वारे पत्रकार मिलिंद चोपडे सह शेतकऱ्यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा