फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेनी केली होळी
परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने
परळी वै. 12 प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, बीड जिल्हा समितीच्या वतीने गुरुवार ता 11रोजी सकाळी अकरा वाजता परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करण्यात येऊन राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफी निर्णयाची होळी करण्यात आली. कर्जमाफी, पीकविमा, देवस्थान व गायरान जमिनी, खते-बियाणे उपलब्धता तसेच शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय किसान सभेच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ता 11 रोजी सकाळी 11 वाजता परळी कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीसमोर शेतकरी एकत्र येऊन सरकारच्या चुकीच्या शेतकरी धोरणा विरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी व्यापक स्वरूपाची कर्जमाफी लागू करावी, कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नसल्याने खरीप 2025 हंगामासाठी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रतिहेक्टर किमान 17,500 रुपयांची भरपाई देण्यात यावी, देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर त्या जमिनी करण्याची कार्यवाही तातडीने करावी, डीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध करून द्यावीत, खते-बियाण्यांमधील भेसळ, कृत्रिम टंचाई आणि चढ्या दराने होणारी विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करावी यासाठी किसान सभेने सरकारी निर्णयाची होळी करून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ पी एस घाडगे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ भगवान बडे, कॉ विष्णु देशमुख, कॉ बालासाहेब कडभाने, कॉ किरण सावजी, कॉ पप्पु देशमुख, कॉ अशोक नागरगोजे, कॉ शेख इस्माईल, कॉ ब्रम्हानंद देशमुख, कॉ शंभुलिंग स्वामी, कॉ शेख खय्युम यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा