युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 संतवाङ्मयाचे संशोधक ॲड.दत्तात्रय महाराज यांचा सत्कार 



तेलगाव(प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा कीर्तनकार ह.भ.प. ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय कारी चे प्राचार्य डाॅ.तेजेस तिडके यांनी शाल,श्रीफळ,

पुष्पगुछ देऊन सत्कार केला.यावेळी संस्थेचे सचिव डॉॅ.पांडुरंग तिडके तसेच प्रा रुपेश दुबे, प्रा सतिश पांचाळ, मोमीन अशपाक उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य तिडके म्हणाले की,दत्तात्रय महाराज यांचे संतवाङ्मयाचे संशोधक म्हणून केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून अलक्षित संत जगमित्र चरित्र आणि अभंग गाथा तसेच मराठी भाषेचा आद्य कवीचा ग्रंथ "सार्थ विवेकसिंधु"

यावरील संशोधन हे अद्वितीय असून संत जगमित्र यांच्या विषयी त्यांनी संबध आयुष्य वेचले आहे असे गौरवोद्गार काढले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या