दुःखद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

इमेज
जितेंद्र नव्हाडे यांना मातृशोक; सौ.नंदाबाई नव्हाडे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           येथील सेवानिवृत्त शिक्षक विलासराव नव्हाडे यांच्या पत्नी सौ नंदाबाई विलासराव नव्हाडे यांचे आज दि. 12 रोजी रात्री दहा वा. च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव जितेंद्र नव्हाडे यांच्या त्या मातोश्री होत.      सौ. नंदाबाई विलास नव्हाडे  अतिशय मनमिळावू व कुटुंब वत्सल गृहिणी म्हणून सर्व परिचित होत्या. आज सायंकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्या 66 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नव्हाडे परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.   आज अंत्यसंस्कार      दरम्यान,नंदाबाई नव्हाडे यांच्या पार्थिवावर आज दि. 13 रोजी परळी वैजनाथ येथे मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्...

 पुरूषोत्तम पुरीतील बोट दुर्घटना ; ना. पंकजा मुंडेंनी महिला भाविकांच्या मृत्यूबद्दल व्यक्त केली हळहळ

बीड दि. १० --

माजलगांव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना अतिशय वेदनादायी आहे, या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करते अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली.

   पुरूषोत्तम पुरी येथे सध्या अधिकमासा निमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गोदावरी नदीकाठी हे मंदिर असल्याने काही भाविक बोटीतून दर्शनाला निघाले होते पण अचानक बोट उलटली आणि यात सिंदखेडराजा तालुक्यातील  रहिवासी सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) व सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. या अपघातात इतर काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

  ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे, ईश्वर दिवंगत आत्म्यांना सद्गगती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशा शब्दांत ना. पंकजाताईंनी मृत्यू झालेल्या महिला भाविकांविषयी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या