युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन

 परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी परळी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना निवेदन



विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

            परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा विकास जनता परिषद आणि इतर विविध संघटनांच्या वतीने ८ जून रोजी करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाची दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम म्हणून दि. १८ जून रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपाळ कृष्णन यांनी, तर आज दि. २३ जून रोजी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ प्रकाश यांनी परळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन प्रवासी व विविध मागण्यांचा आढावा घेतला. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना दिले निवेदन दिले. विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे. 

          परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ प्रकाश यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रवासी मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले. तसेच या सर्व मागण्या परळी आणि मराठवाड्यातील प्रवाशांच्या दृष्टीने कशा अत्यंत योग्य आणि न्याय्य आहेत, हे त्यांना पटवून दिले. मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सौरभ प्रकाश यांनी सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे सकारात्मक आश्वासन समितीला दिले.

       निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

* गाडीचा विस्तार: सध्या धावणारी मुंबई-लातूर एक्सप्रेस परळी वैजनाथ किंवा नांदेडपर्यंत वाढवण्यात यावी.

* डब्यांमध्ये वाढ: नांदेड ते पनवेल गाडीला प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता ती २१ डब्यांची करण्यात यावी. तसेच, निजामाबाद ते पंढरपूर या गाडीला वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी सध्याच्या ९ ऐवजी १६ डबे जोडण्यात यावेत.

* नवीन रेल्वे गाड्या: बिदर ते नांदेड दरम्यान नवीन गाडी सुरू करावी. यासोबतच, परळी वैजनाथ-परभणी-छत्रपती संभाजीनगर-नाशिक मार्गे मुंबईसाठी नवीन रेल्वे गाडी आणि हैदराबाद ते अजमेर (परळी वैजनाथ मार्गे) एक्सप्रेस सुरू करण्यात यावी.

* अमृत भारत योजना: परळी रेल्वे स्थानक येथे केंद्र सरकारच्या 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे अत्यंत दर्जेदार पद्धतीने आणि विहित वेळेत पूर्ण करण्यात यावीत.

यावेळी परळी रेल्वे विकास समितीचे मुख्य निमंत्रक व मार्गदर्शक जी. एस. सौंदळे सर, मुख्य समन्वयक कैलास तांदळे,मार्गदर्शक सत्यनारायण दुबे सर यांच्यासह विविध संघटनांचे इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या