पोस्ट्स

प्रासंगिक लेख / महात्मा फुले जयंती /11 एप्रिल 2026

इमेज
सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.  मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार महात...

आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - राजेभाऊ फड

इमेज
कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडा: परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे आज रास्ता रोको   परळी/प्रतिनिधी कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कन्हेरवाडीचे माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी केले आहे. कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याची  मागणी आता जोर धरू लागली आहे. पाण्याअभावी या भागातील जलाशय कोरडेठाक पडले आहेत. जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा साठवण तलाव अतिशय डोंगराळ भागात असल्याने येथून टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाणी नदीपात्रात सोडणे हा एकमेव पर्याय आहे. या साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडल्यास याचा फायदा परिसरातील गावांना होतो. कन्हेरवाडी, जिरेवाडी, ब्रम्हवाडी, जलालपूर, बँक कॉलनी, समता नगर, शंकर पार्वती नगर...

तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

इमेज
तरुणाच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेतला तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केज :- वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे १० ची परीक्षा दिलेल्या  १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दि. ७ एप्रिल रोजी आई-वडीला सोबत घरी जेवण केले. त्या नंतर तिचे आई-वडील जनावरांना चारा पाणी करीत असताना त्यांची मुलगी  ही रात्री १०:०० च्या सुमारास घरात गेली आणि तिने आतून कडी लावून दरवाजा बंद करून घेतला. मुलगी आवाज देऊनही घर उघडत नसल्याने आईने दरवाजा शेजारी असलेला काच फोडून आत हात घालून दरवाजा उघडला. तेव्हा अनुजाने घराच्या स्लॅबच्या लोखंडी हुकला तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. या प्रकरणी मुलीचे वडील सूर्यकांत मावकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अक्षय भगवान काळे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १८६/२०२६, भ...

वारसाचा फेर घेण्यासाठी मागितली ३९ हजाराची लाच

इमेज
ग्राम महसूल अधिकारी अडकला लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात वारसाचा फेर घेण्यासाठी मागितली ३९ हजाराची लाच  केज :- वारसांच्या फेरसाठी ग्राम महसूल अधिकारी महोदयांनी ३९ हजाराची लाच शेतकऱ्याकडे माहिती त्या नंतर तडजोडी अंती ३५ हजार रु देण्याचे कबुल झाल्या नंतर ९ हजार रु. ची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथील ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकला.       केज तालुक्यात दहिफळ वडमाउली सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर राऊत यांनी पिराची वाडी तालुका केज येथील शेतकऱ्याचा वारसाचा फेर घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ३९ हजाराची लाच मागितली. तडजोडी अंती त्यांच्या ३५ हजार रन देण्याचे कबुल झाले. मात्र शेतकऱ्याला ग्राम महसूल अधिकाऱ्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. त्या नंतर दि. ८ एप्रिल रोजी दहिफळ वडमाउली येथे दुपारी ५ हजार रु. ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस उपाधिक्षक सोपान चित्तमपल्ले, पोलिस निरीक्षक बीडकर, सुरवसे, पुरी हे स...
इमेज
  परळीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  आज (दि. ८ एप्रिल) परळीत यशस्वी सापळा कारवाई करत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणातील आरोपी दशरथ देविदास गोरे (वय ४८) हे ग्रामपंचायत अधिकारी असून जिरेवाडी ग्रामपंचायतीसह पिंपळगाव (गाडे) येथे अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.      तक्रारदार (वय ५४) यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये मंजूर झालेल्या जलसिंचन विहिरीचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाच्या कुशल बिलावर सही करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे १००० रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने बीड ACB कडे ८ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने तडजोडी अंती ५०० रुपये स्वीकारण्यास मान्यता दिली.यानुसार विद्यानगर, परळी येथील एका खाजगी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपीला रंगेहा...
इमेज
  २४ तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल व हत्यारे जप्त धारूर , प्रतिनिधी... धारूर पोलिसांनी जलद व प्रभावी कारवाई करत जबरी चोरीसह दोन गुन्ह्यांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दीड तासांतच पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १३०/२०२६ अंतर्गत फिर्यादी भागवत बबन कांबळे यांच्या तक्रारीनुसार ६ एप्रिल रोजी आंबेवडगाव–धारूर मार्गावरील शिवराज ढाबा परिसरात उभी असलेल्या पिकअप वाहनातून जे.एस.डब्ल्यू. कंपनीचे रंगाचे (पेंट) डबे चोरीला गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ७३०३० रुपयांचा रंगाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.तपासादरम्यान पोलिसांनी मनोज ऊर्फ सोन्या चंद्रकांत घोळवे (वय १९, रा. आंबेवडगाव) व सुमित प्रमोद कंगने (वय १९, रा. धूनकवाड, ता. धारूर) या दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल मेमोरँडम पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आला.तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ८०० चारचाकी गाडी, एअ...

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील हृदयद्रावक घटना

इमेज
"माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो आहे " असे स्टेटस ठेवत तरुणाने नैराश्येतून आपले जीवन संपवले अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुक्यातील युवकांना कोणाची नजर लागली की काय असा यक्षप्रश्न भेडसावू लागला आहे. कारण युवकांत आत्महत्या, अत्याचार, गुंडगिरी , तसेच टवाळखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. नुकतीच दै पुढारीमधून  बातमी देखील प्रकाशित करण्यात आली होती. अशीच तालुक्यात एक २४ वर्षीय तरुणाने नैराश्येतून विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले आहे. मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बोलावले नसल्याच्या कारणातून आलेल्या एकटेपणाच्या भावनेतून तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली असून महेश उद्धव भणगे असे मृत तरुणाचे नाव आहे.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महेशने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. घराच्या छतावर तो एकटाच झोपायला गेला होता. त्याने पाणी पिण्याच्या तांब्यात काहीतरी विषारी द्रव्य मिसळून प्यायले होते. बराच वेळ झाला तरी...

ट्रकच्या धडकेत बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

इमेज
स्कुटीला मागून धडक देत तथागत चौकात दीनदयाळ बँकेच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू अंबाजोगाई (प्रतिनिधी):-  अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर तथागत चौक परिसरात आज भीषण अपघात झाला. ट्रकच्या जोरदार धडकेत स्कुटीवर जात असलेले दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक हे आपल्या स्कूटीवर जात असताना भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून उत्तरीय  कारवाईसाठी मृतदेह स्वा रा ती येथे  पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा  पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड मकरंद पत्की यांच्यासह बँकेचे संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.          मूळचे उजनी गावचे रहिवासी असलेले  स...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!