अंतिम काव्यमय भावना :जीवनातील 'मरणयातना' मांडत पत्करले 'मरण'
"केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!" कौटुंबिक दु:ख अन् पती -पत्नीच्या नात्यांमधील बेवफाईने त्रासून माध्यकर्मी युवकाने केली आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. फेसबूक पोस्ट करत युवकानं आपलं जीवन संपवलं आहे. रामेश्वर गव्हाणे असं या युवकाचं नाव असून, तो परळी तालुक्यातील नागापूर येथील आहे. पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत जीवन संपलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर याने जीवन संपवण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला...
%20(30).jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा