अंतिम काव्यमय भावना :जीवनातील 'मरणयातना' मांडत पत्करले 'मरण'

इमेज
"केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!" कौटुंबिक दु:ख अन् पती -पत्नीच्या नात्यांमधील बेवफाईने त्रासून माध्यकर्मी युवकाने  केली आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. फेसबूक पोस्ट करत युवकानं आपलं जीवन संपवलं आहे. रामेश्वर गव्हाणे असं या युवकाचं नाव असून, तो परळी तालुक्यातील नागापूर येथील आहे. पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.          परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत जीवन संपलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर याने जीवन संपवण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला...

 २४ तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल व हत्यारे जप्त





धारूर , प्रतिनिधी...

धारूर पोलिसांनी जलद व प्रभावी कारवाई करत जबरी चोरीसह दोन गुन्ह्यांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दीड तासांतच पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १३०/२०२६ अंतर्गत फिर्यादी भागवत बबन कांबळे यांच्या तक्रारीनुसार ६ एप्रिल रोजी आंबेवडगाव–धारूर मार्गावरील शिवराज ढाबा परिसरात उभी असलेल्या पिकअप वाहनातून जे.एस.डब्ल्यू. कंपनीचे रंगाचे (पेंट) डबे चोरीला गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ७३०३० रुपयांचा रंगाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.तपासादरम्यान पोलिसांनी मनोज ऊर्फ सोन्या चंद्रकांत घोळवे (वय १९, रा. आंबेवडगाव) व सुमित प्रमोद कंगने (वय १९, रा. धूनकवाड, ता. धारूर) या दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल मेमोरँडम पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आला.तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ८०० चारचाकी गाडी, एअर गन, चाकू, कोयता व मास्क असा हत्यारसामग्रीही जप्त करण्यात आली आहे.

याच दरम्यान घडलेल्या दुसऱ्या घटनेत चोरंबा येथील बाळू भारत भालेराव यांना अडवून त्यांच्या जवळील मोबाईल व खिशातील अडीच हजार रुपये नगदी जबरदस्तीने चोरून नेण्यात आले होते. या घटनेत मोबाईल व नगदी मिळून सुमारे १७,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्यातील मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भताने, हेड कॉन्स्टेबल मुंडे, गोविंद खाडे, शेख जमीर, अशोक कदम, मेजर शेख आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.दरम्यान, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, अटक आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!