अंतिम काव्यमय भावना :जीवनातील 'मरणयातना' मांडत पत्करले 'मरण'

इमेज
"केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!" कौटुंबिक दु:ख अन् पती -पत्नीच्या नात्यांमधील बेवफाईने त्रासून माध्यकर्मी युवकाने  केली आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. फेसबूक पोस्ट करत युवकानं आपलं जीवन संपवलं आहे. रामेश्वर गव्हाणे असं या युवकाचं नाव असून, तो परळी तालुक्यातील नागापूर येथील आहे. पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.          परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत जीवन संपलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर याने जीवन संपवण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला...

वारसाचा फेर घेण्यासाठी मागितली ३९ हजाराची लाच

ग्राम महसूल अधिकारी अडकला लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात




वारसाचा फेर घेण्यासाठी मागितली ३९ हजाराची लाच 

केज :- वारसांच्या फेरसाठी ग्राम महसूल अधिकारी महोदयांनी ३९ हजाराची लाच शेतकऱ्याकडे माहिती त्या नंतर तडजोडी अंती ३५ हजार रु देण्याचे कबुल झाल्या नंतर ९ हजार रु. ची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथील ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकला.

      केज तालुक्यात दहिफळ वडमाउली सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर राऊत यांनी पिराची वाडी तालुका केज येथील शेतकऱ्याचा वारसाचा फेर घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ३९ हजाराची लाच मागितली. तडजोडी अंती त्यांच्या ३५ हजार रन देण्याचे कबुल झाले. मात्र शेतकऱ्याला ग्राम महसूल अधिकाऱ्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. त्या नंतर दि. ८ एप्रिल रोजी दहिफळ वडमाउली येथे दुपारी ५ हजार रु. ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस उपाधिक्षक सोपान चित्तमपल्ले, पोलिस निरीक्षक बीडकर, सुरवसे, पुरी हे सहभागी झाले होते.

देशादेवतून निवृत्त झाल्या नंतर करीत होते महसूल विभागात नोकरी लागताच अब्रु वेशीला 

लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात रंगेहात अडकलेले ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर जाधव हे पूर्वी संरक्षण सेवेत होते. संरक्षण सेवेतून निवृत्त झाल्या नंतर त्यांना महसूल विभागात ग्राम महसुल अधिकारी म्हणून नोकरी लागली होती. परंतु देशसेवा केल्या जो प्रामाणिपपणा असतो. महसूल सेवेत रुजू होताच त्यांनी अब्रु खुंटीला टांगून ठेवली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!