अंतिम काव्यमय भावना :जीवनातील 'मरणयातना' मांडत पत्करले 'मरण'

इमेज
"केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!" कौटुंबिक दु:ख अन् पती -पत्नीच्या नात्यांमधील बेवफाईने त्रासून माध्यकर्मी युवकाने  केली आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. फेसबूक पोस्ट करत युवकानं आपलं जीवन संपवलं आहे. रामेश्वर गव्हाणे असं या युवकाचं नाव असून, तो परळी तालुक्यातील नागापूर येथील आहे. पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.          परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत जीवन संपलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर याने जीवन संपवण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला...

ट्रकच्या धडकेत बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

स्कुटीला मागून धडक देत तथागत चौकात दीनदयाळ बँकेच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू




अंबाजोगाई (प्रतिनिधी):-  अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर तथागत चौक परिसरात आज भीषण अपघात झाला. ट्रकच्या जोरदार धडकेत स्कुटीवर जात असलेले दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक हे आपल्या स्कूटीवर जात असताना भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून उत्तरीय  कारवाईसाठी मृतदेह स्वा रा ती येथे  पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा  पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड मकरंद पत्की यांच्यासह बँकेचे संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

         मूळचे उजनी गावचे रहिवासी असलेले  सुदर्शन टाक हे संपूर्ण बँक परिवारात मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे दीनदयाळ परिवारात हळहळ व्यक्त होऊन दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.  सुदर्शन टाक यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी उजनी येथे सायंकाळी करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!