पोस्ट्स

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...
इमेज
  परळीचे दिवंगत माजी नगराध्यक्ष जाबेर खाँ पठाण यांच्या कुटुंबीयांचे आ. धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळीचे माजी नगराध्यक्ष म. जाबेर खाँ पठाण यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले होते, आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील पठाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन पठाण कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पक्षात एकत्रित राहून शहराच्या विकासासाठी केलेल्या विविध कामांना व आठवणींना उजाळा देत धनंजय मुंडे यांनी जाबेर खाँ यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली. s>  यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अय्युब भाई शेख, शकील कुरेशी यांसह आदी उपस्थित होते. परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती माधवराव मुंडे यांचेही केले सांत्वन स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे जुने सहकारी, परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच टोकवाडी गावचे माजी सरपंच माधवराव मुंडे यांच्या पत्नी कै. द्वारकाबाई मुंडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते. धनंजय मुंडे यांनी टोकवाडी ...

काय आहे बोधचिन्हांचा अर्थ....

इमेज
  नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि  मान्यवरांच्या हस्ते अनावरण   मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह दे...

परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन.....

इमेज
  जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास 19 मेपर्यंत मुदतवाढ बीड | प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड यांच्या वतीने सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या वर्षांकरिता देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत आता 19 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्राप्त प्रस्तावांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर यांनी दिली. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाच्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियम 2020 व 2022 नुसार हे पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये 01 गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, 01 पुरुष खेळाडू, 01 महिला खेळाडू आणि 01 दिव्यांग खेळाडू अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे. सन 2020-21 पुरस्कारासाठी 1 जुलै 2020 ते 30 जून 2021, सन 2021-22 पुरस्कारासाठी 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 आणि सन 2022-23 पुरस्कारासाठी 1 जुलै 20...
इमेज
 कु. हर्मिका जगतकर हिचे बारावी विज्ञान शाखेत घवघवीत यश; 76% गुणांसह उत्तीर्ण बीड | प्रतिनिधी पत्रकार बालाजी जगतकर यांची कन्या कु. हर्मिका बालाजी जगतकर हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत 76 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बीड येथील श्री बंकट स्वामी विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या हर्मिकाने आपल्या मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही खासगी ट्युशनचा आधार न घेता तिने नियमित अभ्यास आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात मोठ्या पदावर कार्य करण्याचा मानस व्यक्त करत हर्मिकाने त्या दृष्टीने आतापासूनच अभ्यासाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. तिच्या या यशामुळे कुटुंबासह विद्यालयाचेही नाव उज्ज्वल झाले आहे. कु. हर्मिका जगतकर हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

दिवसातुन चार तास अभ्यास ...

इमेज
  कुठलीही शिकवणी न लावता आईच्या मोबाईलवर अभ्यास करत आयुष ने मिळवला परळी शहरातुन प्रथम क्रमांक  परळी (प्रतिनिधी)   युवा व किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आला की,रिल्स, इन्स्टाग्राम,फेसबुक असा सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम हे नित्याचेच मोबाईलच्या ऑनलाईन तंत्रज्ञानाचा फक्त आपल्या अभ्यासासाठी उपयोग करत आईच्या मोबाईलवर दोन तास ऑनलाईन आणि शाळेतील शिकवणीचे योग्य नियोजन लावत इयत्ता दहावीच्या परिक्षेत परळी शहरातुन प्रथम येण्याचा मान गणेशपार भागातील चि.आयुष मोहन संघई या विद्यार्थ्याने मिळवत विद्यार्थ्यांनी मोबाईलचा पॉझिटिव्ह वापर कसा करावा याचा आदर्श घालुन दिला आहे.  परळी शहरातील गणेशपार भागात दिगंबर जैन मंदिर समोरील रहिवासी मोहनराव संघई यांना आयुष आणि आगम ही दोन मुले.मोठा मुलगा आयुष हा शहरातील फाउंडेशन स्कुलमध्ये शिक्षण घेत यावर्षी दहावीची परिक्षा दिली.दहावी म्हटले की महागडे आणि प्रत्येक विषयाचे वेगवेगळे क्लासेस लावण्याची स्पर्धा सर्वत्र असताना लहानपणापासुनच अभ्यासात मग्न असलेल्या आयुषने मला कुठलाही क्लास नको फक्त अभ्यासाचे रिव्हीजनसाठी एखादा ऑनलाईन क्लास हवा अशी इच्छा व्यक्त क...

अखंड शिवनाम सप्ताहात परमरहस्य पारायण सोहळ्यास प्रतिसाद ...

इमेज
श्री शनैश्वर जन्मोत्सव व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी श्री शनी मंदिरात रक्तदान शिबीर  परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)          श्री शनी मंदिरात रविवार (दि.१०) पासून श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सप्ताहात गुरुवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास सहभागी होवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.           बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी (दि.१४)  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत ...
इमेज
  परळीत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज खंडित; जनता त्रस्त, महादेव गंगणे पाटील यांचा तीव्र संताप परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरात महावितरणच्या (MSEDCL) अत्यंत ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून महावितरण प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिवसातून अनेक वेळा तासनतास अघोषित वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत वीज गुल होत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. वारंवार वीज जात असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे धंदे कोलमडले असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अनेक भागांत उघड्या डीपी (DP) आणि लोंबकळणाऱ्या वीज तारा दुरुस्त करण्याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात बोलताना शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील म्हणाले की, नागरिक जेव्हा तक्रारी घेऊन महावितरण...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या