परळीचे दिवंगत माजी नगराध्यक्ष जाबेर खाँ पठाण यांच्या कुटुंबीयांचे आ. धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन


परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळीचे माजी नगराध्यक्ष म. जाबेर खाँ पठाण यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले होते, आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील पठाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन पठाण कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पक्षात एकत्रित राहून शहराच्या विकासासाठी केलेल्या विविध कामांना व आठवणींना उजाळा देत धनंजय मुंडे यांनी जाबेर खाँ यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली.
s> 

यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अय्युब भाई शेख, शकील कुरेशी यांसह आदी उपस्थित होते. परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती माधवराव मुंडे यांचेही केले सांत्वन

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे जुने सहकारी, परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच टोकवाडी गावचे माजी सरपंच माधवराव मुंडे यांच्या पत्नी कै. द्वारकाबाई मुंडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते. धनंजय मुंडे यांनी टोकवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुंडे कुटुंबीयांचेही सांत्वन केले. यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, माजी पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे, गणेश मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार