कु. हर्मिका जगतकर हिचे बारावी विज्ञान शाखेत घवघवीत यश; 76% गुणांसह उत्तीर्ण




बीड | प्रतिनिधी

पत्रकार बालाजी जगतकर यांची कन्या कु. हर्मिका बालाजी जगतकर हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत 76 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बीड येथील श्री बंकट स्वामी विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या हर्मिकाने आपल्या मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे, कोणत्याही खासगी ट्युशनचा आधार न घेता तिने नियमित अभ्यास आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भविष्यात मोठ्या पदावर कार्य करण्याचा मानस व्यक्त करत हर्मिकाने त्या दृष्टीने आतापासूनच अभ्यासाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. तिच्या या यशामुळे कुटुंबासह विद्यालयाचेही नाव उज्ज्वल झाले आहे.

कु. हर्मिका जगतकर हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार