संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

दिवसातुन चार तास अभ्यास ...

 कुठलीही शिकवणी न लावता आईच्या मोबाईलवर अभ्यास करत आयुष ने मिळवला परळी शहरातुन प्रथम क्रमांक 

परळी (प्रतिनिधी)

  युवा व किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आला की,रिल्स, इन्स्टाग्राम,फेसबुक असा सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम हे नित्याचेच मोबाईलच्या ऑनलाईन तंत्रज्ञानाचा फक्त आपल्या अभ्यासासाठी उपयोग करत आईच्या मोबाईलवर दोन तास ऑनलाईन आणि शाळेतील शिकवणीचे योग्य नियोजन लावत इयत्ता दहावीच्या परिक्षेत परळी शहरातुन प्रथम येण्याचा मान गणेशपार भागातील चि.आयुष मोहन संघई या विद्यार्थ्याने मिळवत विद्यार्थ्यांनी मोबाईलचा पॉझिटिव्ह वापर कसा करावा याचा आदर्श घालुन दिला आहे.

 परळी शहरातील गणेशपार भागात दिगंबर जैन मंदिर समोरील रहिवासी मोहनराव संघई यांना आयुष आणि आगम ही दोन मुले.मोठा मुलगा आयुष हा शहरातील फाउंडेशन स्कुलमध्ये शिक्षण घेत यावर्षी दहावीची परिक्षा दिली.दहावी म्हटले की महागडे आणि प्रत्येक विषयाचे वेगवेगळे क्लासेस लावण्याची स्पर्धा सर्वत्र असताना लहानपणापासुनच अभ्यासात मग्न असलेल्या आयुषने मला कुठलाही क्लास नको फक्त अभ्यासाचे रिव्हीजनसाठी एखादा ऑनलाईन क्लास हवा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर वडिल मोहनराव आणि चुलते महावीर संघई यांनी आयुषला फिजिक्स वाला हा ऑनलाइन क्लास लावुन दिला.शाळेतील अभ्यासाला जोड म्हणुन आयुषने हा क्लास जॉईन केला परंतु यासाठी मोबाईल आवश्यक होता.आई सुवर्णाताई मोहन संघई यांनी आपला मोबाईल देत आयुषच्या अभ्यासाकडे लक्ष दिले.इयत्ता दहावीचा नुकताच निकाल लागला असुन यामध्ये आयुषने ९५.४० टक्के गुण घेत परळी तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविला.वर्षभर अभ्यास करत असताना आयुषने आपले वडिल व काकांचा व्यवसाय असलेल्या हेमा गिफ्ट सेंटर या दुकानावर जाऊन व्यवसायात मदत करत अभ्यासाचे योग्य नियोजन मोबाईलचा सकारात्मक वापर करत मिळवलेले यश हे कौतुकास्पद ठरत असल्याने आयुष व कुटुंबियांचे कौतुक होत आहे.

@@@@

दिवसातुन चार तास अभ्यास 

 शाळेव्यतिरिक्त आयुषने वर्षभर दररोज दोन तास ऑनलाईन शाळेतुन आल्यानंतर दोन तास अशा चार तास अभ्यासाचे नियोजन केले परिक्षा काळात पहाटे चार वाजता ऊठुन अभ्यास व रिव्हीझन दिल्याने हे यश मिळाले असुन यामध्ये काका महावीर,काकी मनिषाताई,आई सुवर्णताई,वडिल मोहनराव यांच्याबरोबरच शाळेतील शिक्षक गजानन नागझरे,राहुल गुट्टे,तोतला मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असुन भविष्यात पुणे येथे वाणिज्य शाखेत शिक्षण घेवुन सि.ए.बनण्याचा मनोदय आयुषने व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....